Rohit Pawar On Ajit Pawar | अजित पवारांना रोहित पवारांचे थेट आव्हान, ”अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्यांना…”

0

पुणे : Rohit Pawar On Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) महाविकास आघाडीच्या उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अत्यंत आक्रमक प्रचार करत आहेत. ते थेट अजित पवार यांच्यावर घणाघात करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी अजितदादांना थेट आव्हान दिले आहे. ते दौंड तालुक्यातील (Daund Sabha) वरवंडमध्ये जाहीर प्रचारसभेत बोलत होते.

दौंडमधील या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, रोहित पवार, भूषणसिंह होळकर हे नेते या सभेला उपस्थित आहेत. या सभेत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली.

रोहित पवार म्हणाले, आमचे कुटुंब फोडले. आमचा एक नेता पळवून नेला आणि त्याला इथे उभे केले. त्यांना वाटत होते की पवारसाहेब या मतदादरसंघात अडकून पडतील. पण पवारसाहेबांनी राज्यात ५४ सभा घेतल्या.

अजित पवारांना थेट आव्हान देताना रोहित पवार म्हणाले, अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बोलवा. महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही. आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणेल.

रोहित पवार पुढे म्हणाले, अजित पवार जर तुम्ही पवारसाहेबांना वडील म्हणत होतात. मग लोकांना वाटत आहे की तुम्ही वडिलांचे झाले नाहीत, तर जनतेचे काय होणार?

रोहित पवार म्हणाले, उद्या पवार साहेबांचा पालकमंत्री असणार आहे. पवार साहेब तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. तुम्ही अडचणीत होतात म्हणून सोडले. मलाही एखादे पद भेटले असते. कारवाई झाली नसती पण गेलो नाही. आपण सर्व साहेबांसोबत आहोत.

रोहित पवार म्हणाले, सुप्रियाताईंना तिसऱ्यांदा खासदार करायचे आहे. ही निवडणूक आपण भाजपच्या विरोधात लढत आहोत. ही लढाई शरद पवारसाहेब विरुद्ध भाजप आहे. सामान्य नागरिक विरूद्ध भाजप आहे. जनतेसाठी या लोकांनी काय केले? सामान्य लोकांच्या हितासाठी हे सत्तेत गेले नाहीत. स्वतःचा विकास करण्यासाठी गेले आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.