Jyoti Mete | पुण्यात ‘शिवसंग्राम’ची बैठक, लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा, ज्योती मेटे यांनी स्पष्टच सांगितले…

0

पुणे : Jyoti Mete | पुण्यात शिवसंग्राम संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीवर तसेच लोकसभा निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा याबाबत चर्चा करण्यात आली. (Lok Sabha Election 2024)

या बैठकीनंतर ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. ज्योती मेटे यांनी म्हटले की, सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. सर्वांचे मत जाणून घेतले. यानंतर शिवसंग्राम संघटनेने (Shiv Sangram Sanghatana) लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्योती मेटे म्हणाल्या, बीडसाठी (Beed Lok Sabha) थांबलो होतो. पण आता लोकसभा निवडणुकीत थांबू. नंतर बैठक घेऊन १२ जागा विधानसभेच्या लढू. आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. नाराजीचा प्रश्न नाही. योग्य वेळी योग्य निर्णय झाला आहे. बीड लोकसभा मी लढवावी, अशी जनतेची इच्छा होती, म्हणून मी लढणार होते. सर्व माहिती घेऊन नंतर मी माघार घेतली. कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही लोकसभा निवडणुकीत मदत करणार नाही, हाच याचा अर्थ आहे.

तर शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे म्हणाले, आम्ही महायुतीमध्ये होतो, हा भुतकाळ आहे. का लढणार नाही याचे कारण सांगायची गरज नाही. नाराजीचा प्रश्न नाही. सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आम्ही मतदान करणार पण पक्षाला पाठिंबा देणार नाही.

दरम्यान, ज्योती मेटे या बीड लोकसभा निवडणूक लढवणार होत्या. शरद पवार यांच्याशी त्यांची चर्चा देखील झाली होती. मात्र त्या शिवसंग्रामच्या चिन्हावर निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने यावर एकमत झाले नाही. आता शिवसंग्रामची पुढील भूमिका देखील ज्योती मेटे यांनी आज स्पष्ट केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.