Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक

0

पिंपरी : – Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पोलीस असल्याची बतावणी करुन दुकानदारांकडून विविध वस्तू खरेदी केल्या. त्याचे पैसे न देता पेमेंट ऑनलाइन पाठवल्याचे स्क्रिन शॉट दाखवून फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी (Sangvi Police) तरुणाला अटक केली. नवी सांगवी (Navi Sangvi) व पिंपळे गुरव (Pimple Gurav) परिसरात डिसेंबर 2023 ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत हा प्रकार घडला.

अमोल आबासाहेब कायगुडे Amol Abasaheb Kaygude (वय-33 रा. मु.पो. गणेशवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर सध्या रा. औंध हॉस्पिटल कॉर्टर, सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुरेशलाल मिस्त्रीलाल खिंवसरा (वय-62 रा. समर्थनगर कॉर्नर, सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी 406, 420, 170 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना सांगवी पोलीस चौकी मधील गुन्हे शाखेचा पोलीस असल्याची बतावणी केली. आरोपीने गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहुन पोलीस असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा लोगो व नाव वापरुन वेगवेगळ्या दुकानात जाऊन दुकानदारांची फसवणूक केली.

फिर्यादी सुरेसलाल हे कापड व्यावसायिक आहेत. त्यांचे कापड विक्रीचे दुकान आहे. आरोपी अमोल कायगुडे याने सुरेशलाल यांच्या दुकानातून वेगवेगळ्या वस्तु खरेदी केले. त्यावेळी त्याने पेमेंट न करात मोबाईलमध्ये फोन पे अॅपमध्ये निकनेमच्या जागी दुकानाचे नाव टाकून स्वत:च्या बँक खात्यामध्ये पैसे पाटवले. त्यानंतर पेमेंट झाले असल्याची स्क्रिन शॉट तयार करुन दाखवून फसवणूक केली. आरोपीने फिर्य़ादी याच्यासह इतरांचीही अशाच प्रकारे 10 हजार 320 रुपयांची फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कणसे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.