ACB Trap News | लाच स्वीकारताना नगरपरिषदेचे मुख्यअधिकरी व विद्युत पर्यवेक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

0

बुलढाणा : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ACB Trap News | पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीच्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून जळगाव जामोद नगरपरिषदेचे (Jalgaon Jamod Municipal Council) मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक यांना 12 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) अटक केली आहे. ही कारवाई नगरपरिषदेच्या कार्यालयात बुधवारी (दि.13) करण्यात आली.

मुख्याधिकारी आकाश अविनाश डोईफोडे Chief Officer Akash Avinash Doifode (वय 32 रा. मोहरी ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor) दिपक कैलास शेळके Deepak Kailas Shelke (वय-30 रा. उबाळखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत जळगाव जामोद येथील 41 वर्षीय व्यक्तीने बुलढाणा एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) 8 नोव्हेंबर, 11 व 12 डिसेंबर रोजी लाच पडताळणी करुन बुधवारी (दि.13) सापळा रचून दोघांना लाच घेताना रंगेहात पकडले.

तक्रारदार यांच्या कंपनीने नगरपरिषद जळगाव जामोद अंतर्गत पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले आहे. तक्रारदार यांच्या कंपनीने केलेल्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर चे बिल तसेच तक्रारदार यांनी स्वतः केलेल्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून विद्युत पर्यवेक्षक दिपक शेळके यांनी लाचेची मागणी (Demanding a Bribe) केली. शेळके यांनी स्वतः साठी सहा हजार रुपये व मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांच्यासाठी सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये लाचेची मागणी केली. मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक लाच मागत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात (Buldhana ACB Trap News) केली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता डोईफोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन रक्कम स्वीकारण्यास
संमती दिली. तसेच लाचेची रक्कम शेळके यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यावरून सापळा कारवाई आयोजित केली.
विद्युत पर्यवेक्षक दिपक शेळके यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बुलढाणा एसीबीचे पोलीस उपअधिक्षक शितल घोगरे (DySP Shital Ghogre) करीत आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र (AmravatiACB)
पोलीस अधिक्षक मारुती जगताप
(SP Maruti Jagtap), अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware) यांच्या
मार्गदर्शनाखाली बुलढाणा एसीबीचे पोलीस उपअधिक्षक शितल घोगरे, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे (PI Sachin Ingle),
पोलीस निरीक्षक महेश भोसले (PI Mahesh Bhosale), पोलीस अंमलदार शाम भांगे, विलास साखरे, प्रवीण बैरागी,
रवी दळवी, जगदीश पवार, विनोद लोखंडे, शैलेश सोनवणे, स्वाती वाणी आणि चालक नितीन शेटे, अरशद शेख
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.