Supriya Sule On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील आगमनापूर्वी सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या – ”आम्ही त्यांचे ‘तुतारी’ वाजवून स्वागत करू”

0

पुणे : Supriya Sule On PM Narendra Modi | अतिथी देवो भव! जेवढे पाहुणे येतील, त्यांचे स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. तुतारी (Tutari) वाजवून आम्ही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करू, असा टोला बारामतीच्या (Baramati Lok Sabha) महाविकास आघाडीच्या उमेदवार (Mahavikas Aghadi) आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

रेसकोर्स, पुणे (Pune Race Course) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सभा होणार आहे. पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तसेच बारामती, शिरूर (Shirur Lok Sabha) आणि मावळ मतदार संघातील (Maval Lok Sabha) उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, भाजपाने काल मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील (Mumbai North Central Lok Sabha) उमेदवार जाहीर केला. यामध्ये वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी देत भाजपाने (BJP) सर्वांनाच धक्का दिला. मात्र, यातून भाजपाने दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्या कन्या पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पूनम महाजन यांनी अनेक वर्षे चांगले काम केले आहे. त्यांचे वडील प्रमोद महाजन हे केवळ भाजपाच नाही तर देशाच्या राजकारणातील एक मोठे नेते होते. स्वत: पूनम महाजन यांनी भाजयुमोच्या माध्यमातून काम केलेले आहे. त्यांचे तिकीट का कापण्यात आले हे माझ्यासाठी आश्चर्यंकारक आहे

Leave A Reply

Your email address will not be published.