Baramati Lok Sabha | दौंड, इंदापूरमधून यंदा सुनेत्रा पवारांना मिळू शकते चांगले मताधिक्य, राजकीय विश्लेषकांचे मत

0

पुणे : Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे यंदा संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथे एकाच कुटुंबातील नणंद सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरूद्ध भावजयी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा सामना रंगत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawa NCP) यांनी फूट पाडल्यानंतर येथे बरीचशी राजकीय गणितं बदलली आहेत. एकुणच राजकीय स्थिती पाहता या निवडणुकीत दौंड (Daund Vidhan Sabha), इंदापूरमधून (Indapur Vidhan Sabha) सुनेत्रा पवारांना चांगले मताधिक्य मिळू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

येथे २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणाऱ्या सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात भाजपाच्या कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली होती. सुळे यांनी कुल यांच्यावर १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी मात केली होती.

पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे. त्यातच अजित पवारांसोबत रमेश थोरात (Ramesh Thorat), राहुल कुल (Rahul Kul) आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आहेत. त्यांच्या एकत्र ताकदीमुळे या मतदारसंघांत सुळे यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दौंड आणि इंदापूर या दोन्ही मतदारसंघांत सुनेत्रा पवार यांचा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून थेट संपर्क असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांतून सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गेल्या निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघात (Purandar Vidhan Sabha) सुप्रिया सुळे यांना अवघ्या ९ हजार ६८१ मतांची आघाडी मिळाली होती. तुलनेने शहरी असलेल्या खडकवासला मतदारसंघातून (Khadakwasla Vidhan Sabha) भाजपाच्या मतदारांच्या माध्यमातून कुल यांनी ६५ हजार ४९४ मतांची आघाडी मिळविली होती.

भाजपाचा हा मतदार यावेळी सुनेत्रा पवार यांना मदत करेल, हे उघड आहे. अजित पवारांचा गावोगावी असणारा संपर्क, राजकारणावर असलेली पकड आणि महायुतीची मिळालेली साथ यामध्यमातून सुनेत्रा पवारांना चांगला फायदा होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.