Bhaskar Jadhav | अमित शाह, योगी आदित्यनाथ कोकणात यायच्या भानगडीत पडू नका, इथे आलात तर…, भास्कर जाधवांचा इशारा

0

मुंबई : Bhaskar Jadhav | खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. तरीही त्यांनी त्यांना पराभूत करून पहिले सुवर्णपदक जिंकले होते. आमचे विनायक राऊतही (Vinayak Raut) तसेच आहेत. मी आज अमित शाह (Amit Shah) आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना सांगतो की तुम्ही कोकणात यायच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तरी विनायक राऊत आणि कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजपा नारायण राणेंच्या प्रचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इत्यादी नेते येणार आहेत. या दौऱ्यांवरून भास्कर जाधव यांनी भाजपाला हा इशारा दिला.

दरम्यान, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघात (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत विरूद्ध भाजपाचे (BJP) नारायण राणे (Narayan Rane) अशी लढत होणार आहे. याच मतदारसंघामधून विनायक राऊत यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

त्यांनी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांना पराभूत केले होते. आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र यावेळी विनायक राऊत यांची लढत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.