Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – हिवाळ्यात बहुतेक लोक कोमट पाणी पितात (Benefits Of Lukewarm Water). काही लोक मात्र प्रत्येत ऋतूत आपल्या दिवसाची सुरूवात गरम पाण्याने करतात (Warm Water). आज आपण रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या आरोग्यासाठी पाणी अत्यंत चांगले असते. आपण जेवढे जास्त पाणी पितो, तेवढा जास्त फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो (Benefits Of Lukewarm Water). अनेकदा डॉक्टर आपल्याला सांगतात की, दररोज ३-४ लिटर पाणी प्यावे. मात्र तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात कोमट पाणी पिऊन करत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

जाणून घेऊया रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे (Benefits Of Lukewarm Water) –

वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम (Best For Weight Loss) –

वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे. शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासोबतच गरम पाणी चयापचय दर देखील सुधारते. तुम्ही रोज एक ग्लास कोमट पाण्यात मध टाकूनही पिऊ शकता. यामुळे वजन सहज कमी होते.

शरीर डिटॉक्स करते (Detox The Body)

कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण सहज निघून जाते. यासोबतच कोमट पाणी आतड्यात साचलेली घाण काढून टाकण्यासही मदत करते. लिंबू मिसळून कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील घाण निघण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता पासून आराम मिळतो (Relief From Constipation)

रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.

हंगामी रोगांपासून संरक्षण होते (Protects Against Seasonal Diseases )

गरम पाणी प्यायल्याने मौसमी फ्लू (Flu), खोकला (Cough) आणि सर्दीपासून (Cold) आराम मिळतो.
याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती ही (Immunity Power) चांगली राहते.
कोमट पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
त्यामुळे दुखणे (Body Pain) आणि सायनस (Sinus Problem) सारख्या आजारांपासून आराम मिळतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.