Pune News | पवार कुटुंबिय प्रथमच ‘माध्यमांच्या’ कार्यालय भेटीवर ! सुनेत्रा पवार यांच्या माध्यम कार्यालय भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

0

पुणे : Pune News | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील (NCP) फुटीमुळे ‘पवार’ कुटुंबातील (Pawar Family) समीकरणे बदलली आहेत. कुटुंबातील बहुतांश सर्व सदस्य हे ‘थोरल्या’ पवार साहेबांसोबत गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कुटुंब एकाकी पडले आहे. अशातच बारामती मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha Election 2024) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) अशी नणंद भावजयीची लढत होत असल्याने सर्वच देशाचे या ‘हाय होल्टेज’ लढतीकडे लक्ष लागले आहे. यामुळे दोन्ही बाजूकडून कुठलिच कसर राहाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच की काय आतापर्यंत कधीच कुठल्या माध्यमांच्या कार्यालयाकडे न फिरकणार्‍या अजित पवार यांच्या कुटुंबियांनी माध्यमांच्या कार्यालयांकडेही हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी आज शहरातील बहुतांश सर्व प्रमुख माध्यमांच्या कार्यालयांना भेट देउन संपादकीय मंडळांसोबत संवाद साधल्याने, ही बाब समोर आली आहे. यापुर्वी राजकारणाचा पाच दशकांहून अधिककाळ अनुभव असलेले शरद पवार अलिकडच्या काळात कधी कुठल्या माध्यमांच्या कार्यालयात गेल्याचे पाहायला मिळाले नाही. माध्यमांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती राहीली. परंतू पत्रकार मित्रांशी त्यांचा कार्यालयाबाहेरच अधिक संवाद राहीला आहे.

   राज्याच्या राजकारणात गेली तीस वर्षे कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, २००४ पासून संसदेत प्रतिनिधीत्व करणार्‍या खासदार सुप्रिया सुळे, जिल्हापरिषद सदस्य आणि आमदार अशी साधारण सात वर्षांची कारकिर्द असलेल्या रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी देखिल शरद पवार यांचाच कित्ता गिरवत कधीही थेट कुठल्या माध्यमांच्या कार्यालयांना स्वत:हून भेट दिली नाही. या पार्श्‍वभूमीवर सुनेत्रा अजित पवार यांच्या माध्यमांच्या कार्यालय भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.