Ramdas Athawale On Mahayuti Leaders | दौंडच्या सभेत रामदास आठवलेंनी महायुतीच्या नेत्यांनाच दाखवून दिली चूक, म्हणाले..!

0

पुणे : Ramdas Athawale On Mahayuti Leaders | निवडणुकीच्या प्रचारात आरपीआय आठवले गटाचा निळा झेंडा आणि उपरणे आवर्जुन दर्शवणारे महायुतीचे नेते आणि पदाधिकारी जाहीरपणे बोलताना मात्र तीन पक्षाचे सरकार आहे, असे म्हणतात. यावरून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या नेत्यांना त्यांची चूक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत निदर्शनास आणून दिली.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Daund Sabha) बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) महायुतीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या प्रचारसभेत आठवले बोलत होते. सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे (Dilip Kamble Former Minister), आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul), माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat Former MLA), वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, वैशाली नागवडे, प्रेमसुख कटारिया, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, रवींद्र कांबळे, नागसेन धेंडे, आदी उपस्थित होते.

यावेळी रामदास आठवले यांनी म्हटले की, राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे तीन पक्षाचे सरकार आहे, असे तुम्ही सारखे म्हणता. पण आम्ही रिपब्किलन पार्टी ऑफ इंडिया पण तुमच्यासोबत आहोत हे ध्यानात असू द्या.

रामदास आठवले म्हणाले, नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलतील, असा खोटा प्रचार विरोधक करत आहेत. राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच येत नाही आणि जो तसा प्रयत्न करेल त्याला आम्ही देशातून हाकलून लावू.

रामदास आठवले म्हणाले, मला सुप्रिया सुळे यांचा आदर आहे, पण आता संसदेत बोलण्यासाठी समंजस लेक आणि सून असणार्या सुनेत्रा अजित पवार यांना मत देऊन दिल्लीत पाठवा.

या सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सूर्य व चंद्र आहे तोपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना कोणी बदलू शकणार नाही. १० वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता महायुतीच्या उमेदवारास विजयी करा, असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.