Home Remedies For Snoring | ‘या’ 5 घरगुती उपायांनी होईल घोरण्याची समस्या कायमची दूर, घोरण्यापासून मिळेल लवकरच आराम…

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम –अनेकांना जोरजोरात घोरण्याची सवय असते (Home Remedies For Snoring). त्यामुळे जवळ झोपणाऱ्यांची झोप उडते. घोरण्याची अनेक कारणे असू शकतात. झोपेत असताना श्वसनसंस्थेत अडथळा निर्माण झाल्यास शरीराच्या अंतर्गत पेशींच्या कंपनामुळे नकोसा आवाज येतो (Snoring While Sleeping). काही लोक थकवा (Weakness) किंवा तणावामुळेही (Stress) घोरतात. याशिवाय काही लोकांना त्यांचा आरोग्यातील काही समस्यांमुळेही घोरण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करता कामा नये. चला जाणून घेऊया घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय… (Home Remedies For Snoring)

1. ऑलिव्ह तेल (Olive Oil)

ऑलिव्ह ऑइल मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ऑलिव्ह ऑईल सूज येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही. ऑलिव्ह ऑईल घोरणे दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब नाकात टाकल्याने लवकर आराम मिळतो.

2. हळद (Turmeric)

घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी हळद प्रभावी ठरू शकते. त्यात एंन्टी इंन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म नाकातील रक्तसंचय आणि सूज दूर करण्यास मदत करतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद मिसळून प्यायल्याने घोरण्याची समस्या दूर होईल आणि तुमची झोपही चांगली होईल (Peaceful Sleep).

3. मध (Honey)

घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी देखील मध खूप उपयुक्त ठरू शकते. मधात असणाऱ्या अँटी-इंफ्लेमेटरी (Anti Inflammatory) आणि अॅण्टी-मायक्रोबियल (Anti Microbial) गुणांमुळे श्‍वसनाचा त्रास दूर होण्‍यास मदत होते. एका ग्लास पाण्यात एक चमचा मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने लवकर आराम मिळतो (Home Remedies For Snoring).

4. देशी तूप (Pure Ghee)

देशी तूप घोरणे दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
देशी तूप थोडे गरम करून त्याचे काही थेंब नाकात टाकावे.
असे नियमित केल्याने तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून (Snoring Problem) सुटका मिळवू शकता आणि यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही.

5. लसूण (Garlic)

सायनसमुळे घोरणे ही समस्या देखील असू शकते.
अशा वेळी लसूण अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या पाकळ्या भाजून कोमट पाण्यासोबत घेतल्याने घोरण्याची समस्या दूर होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.