Maharashtra Crime News | निकाह होण्यास काही तास असताना वधुची गळफास घेऊन आत्महत्या

0

सोलापूर : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Maharashtra Crime News | विवाहासाठी सर्व पाहुणे घरी आले असताना निकाह काही तासात होणार असताना नवरी मुलीने राहत्या घरी बेडरुममधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Solapur Suicide Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Maharashtra Crime News)

सालिया महेबुब शेख (वय २५, रा. ओम नम : शिवाय नगर, कुमठेगाव रोड, सोलापूर) असे आत्महत्या (Solapur Crime News) केलेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणेसहा वाजता उघडकीस आला. (Maharashtra Crime News)

सालिया शेख हिचा विवाह आज होणार होता. घरी पाहुणेही आले होते. दरम्यान, सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी बेडरुममधील सिलिंग फॅनला तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने खाली उतरवुन बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात आणले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
या घटनेची माहिती मिळताच शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून
त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
विजापूर नाका पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.