Pune Crime News | प्रवाशाला लाकडी बांबूने मारहाण, चार जणांवर गुन्हा; उरुळी कांचन येथील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | प्रवाशाला घेऊन जात असताना प्रवाशाने गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, चालकाने गाडी न थांबवल्याने प्रवाशाने ब्रेक दाबून गाडीची चावी काढून घेतली. याचा राग आल्याने चार जणांनी प्रवाशाला लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार पुणे सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) उरुळी कांचन येथे 11 डिसेंबर रोजी घडला. (Pune Crime News)

याबाबत सुनिल गोराप्पा संपांगे (वय-32 रा. तुळशीराम नगर, प्रयागधाम रोड, उरुळी कांचन ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) रविवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळु मिस्कील, गहिनीनाथ मिसाळ (रा. परांडा, जि. उस्मानाबाद), दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 324, 323, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल संपांगे यांना हडपसर येथून उरुळी कांचन येथील घरी जायचे होते. त्यामुळे त्यांनी पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पो चालकाकडे लिफ्ट मागितली. फिर्यादी यांना उरुळी कांचन येथील ऐलाईट चौकात उतरायचे असल्याने त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने टेम्पो थांबवला नाही.

त्यामुळे फिर्यादी यांनी गाडीचा ब्रेक दाबून गाडी थांबवली तसेच गाडीची चावी काढून घेतली.
याचा राग आल्याने चौघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.
तसेच इतर आरोपींनी लाकडी बांबूने मारहाण करुन जखमी केले.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.