NCP MLA Rohit Pawar | ‘तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीबांना अडचणीत का आणता?’ MIDC वरून रोहित पवारांचा संतप्त सवाल

0

अहमदनगर : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – NCP MLA Rohit Pawar | कर्जत-जामखेड एमआयडीसीची (Karjat-Jamkhed MIDC) मंजुरी राजकीय श्रेयासाठी महायुती सरकारने आडवून ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा मांडला. आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपला संताप व्यक्त करत महायुती सरकारला सुनावले आहे.

कर्जत-जामखेड एमआयडीसीबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, तुम्हाला एमआयडीसीचे श्रेयच हवे असेल तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की ही एमआयडीसी तुमच्यामुळेच झाली. पण असले रिकामे उद्योग कशाला करता? तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीब जनतेला, पुढच्या पिढ्यांना कशाला अडचणीत आणता?

एखाद्या भागात उद्योग व्यवसाय आल्याने त्या भागाची होणारी भरभराट मी पाहिली आहे. त्या भागातल्या सर्वसामान्यांचे उंचावणारे जीवनमान मी पाहिले आहे. ज्याप्रमाणे योग्य नियोजन करून बारामती, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर यासारख्या अनेक भागात औद्योगिक विकास झाला, भरभराट झाली तोच विकास तीच भरभराट माझ्या भागातही व्हावी, ही माझी साधी इच्छा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे.

त्यांनी पुढे लिहिले आहे की, युवा संघर्ष यात्रेत (Yuva Sangharsh Yatra) चालत असताना सुद्धा प्रत्येक भागात त्या-त्या जिल्ह्यात त्या-त्या तालुक्यात एमआयडीसी व्हाव्यात ही युवा वर्गाची मागणी समोर आली. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे, लढत आहे.

महायुती सरकारवर आरोप करताना रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी म्हटले आहे की, सर्व काही झालं आहे, सर्वेक्षण झालं आहे, सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, फक्त एक सही तेवढी बाकी आहे. परंतु केवळ राजकीय श्रेयवादातून एमआयडीसी जाणून बुजून रोखली जात आहे.

रोहित पवारांनी म्हटले आहे की, एखाद्या बिनडोक, कुठलीही दूरदृष्टी नसलेल्या आणि राजकीय स्वार्थासाठी जनहिताचा
बळी देणाऱ्या व्यक्तीच्या दबावापोटी लाखो लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का? एकनाथजी शिंदे साहेब
(CM Eknath Shinde), अजितदादा (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस साहेब (Devendra Fadnavis)
तुम्ही तर कार्यक्षम आहात. जनतेसाठी काय योग्य आहे, काय अयोग्य हे किमान तुम्हाला तरी कळायला हवे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, सरकारच्या याच धोरणामुळे राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत आणि नवे
उद्योग यायला तयार नाहीत. बँक असिस्टेड प्रोजेक्ट (Bank Assisted Project) च्या गुंतवणुकीत उत्तरप्रदेश ४३१८० कोटी,
गुजरात ३७३१७ कोटी, ओडीसा ११८१० कोटी ही राज्य पहिल्या तीन मध्ये आहेत तर महाराष्ट्र ७९०० कोटी च्या
गुंतवणुकीसह चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

हे असंच चालू राहिलं तर उद्याची पिढी तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही. हे असं अधोगतीकडे नेणारे राजकारण
महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. विकासाचं राजकारण करायचं की काही बिनडोक लोकांच्या राजकीय दबावाला
बळी पडून अधोगतीचं राजकारण करायचं याचा विचार राज्याच्या नेतृत्वाने करायला हवा.

त्यामुळं कुठलाही आकस न ठेवता आणि कोणत्याही दबावाला भीक न घालता कर्जत-जामखेडच्या १००० एकर हून
मोठ्या एमआयडीसीला आपण तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.