Pune Police MCOCA Action | धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 95 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | दोघांना धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या इतर तीन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 95 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने दोघांना धारदार हत्याराने मारहाण करुन जखमी केले. तसेच हवेत हत्यारे फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी अमर बसवराज जमादार (वय-20 रा. गोपाळपट्टी, मांजरी), अमन अशोक नरोटे (वय19), श्रीपती संतोष सरोदे (वय19) यांना अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींवर आयपीसी 307, 341, 324, 323, 504, 506, 427, 34, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत अमोल राजाराम घाटे (वय-25 रा. विठ्ठल मंदिराजवळ, माळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर रोजी माळवाडी परिसरात घडला होता.

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव (Pune Police MCOCA Action) करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Senior PI Ravindra Shelke) यांनी परिमंडळ 5 पोलीस उपायुक्त आर. राजा
(DCP R. Raja) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivle),
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (PI Vishwas Dagle), सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप
(API Sarika Jagtap), पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी (PSI Suvarna Gosavi),
निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, वसीम सैय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे राजश्री खैरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.