Pune Crime News | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | मौजमजेसाठी किंवा गर्लफ्रेंडवर प्रभाव पाडण्यासाठी तरुणांकडून दुचाकी चोऱ्या (Bike Thieves) केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) एका 52 वर्षीय चोरट्याला अटक केली आहे. त्याने मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून तीन लाख 10 हजार रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्या आहेत. (Pune Crime News)

हेमंत बाजीराव लगड (वय-52 रा. रामनारायण बंगला, एफ.सी.रोड, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला डेक्कन परिसरातून अटक करण्यात आली आहे. खुडे ब्रिजवर पार्क केलेली 80 हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची होंडा अॅक्टीव्हा चोरीला गेल्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) तपास पथकाकडून वाहन चोरांची व चोरीस गेलेल्या वाहनांची माहिती संकलीत करुन तांत्रिक तपास सुरु केला होता. यादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक (API Bajirao Naik) पोलीस अंमलदार वाघमारे, अतुल साठे, प्रविण राजपुत यांनी आरोपी हेमंत लगड याला डेक्कन परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र परदेशी उर्फ चिकन्या (वय-25 पत्ता माहित नाही) याने आणखी दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी हेमंत लगड याच्याकडून 3 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीने शिवाजीनगर आणि बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bundagarden Police Station) हद्दीतून वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल (DCP Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर
(ACP Vasant Kuvar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior PI Arvind Mane),
पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (PI Vikram Goud),
सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक,
पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, अतुल साठे, वालकोळी, प्रविण राजपुत, खुरंगे, तुकाराम म्हस्के, शरद राऊत महिला पोलीस अंमलदार रुचिका जमदाडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.