Pune Crime News | पुणे : रिक्षा अडवून तरुणीला धमकावणाऱ्या तरुणावर FIR

0

पुणे : – Pune Crime News | रिक्षातून जात असलेल्या तरुणीची रिक्षा रस्त्यात अडवून तिला लग्नाची मागणी घातली. तसेच लग्न केले नाही तर तुझ्या बहिणींना काहीतरी करेन अशी धमकी दिली. हा प्रकार कात्रज चौक ते रविवार पेठ, मंडई या दरम्यान 15 एप्रिल ते 18 मे दरम्यान वारंवार घडला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Katraj Chowk To Raviwar Peth, Mandai)

याबाबत 23 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन यशराज मिसाळ (वय-27 रा. पर्वती) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिसाळ याने फिर्यादी तरुणीचा वारंवार पाठलाग करुन माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगितले. मात्र फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. 18 मे रोजी फिर्यादी या रिक्षातून कात्रज येथून मंडई कडे येत असताना आरोपीने वाटेत रिक्षा अडवली. त्याने तिचा मोबाईल नंबर मागितला. तसेच तु माझ्याशी लग्न केले नाही, माझ्याशी बोलली नाही तर मी तुझ्या बहिमींना काहितरी करेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

तरुणीचा पाठलाग करुन केला विनयभंग

पुणे : तरुणीच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन वारंवार कॉल करुन बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलून लग्न करायचे आहे असे मेसेज करुन मानसिक त्रास दिला. मुलीला भेटण्याचा प्रयत्न करुन भररस्त्यात तिला आवाज देऊन पाठलाग केल्या प्रकरणी मनप्पारेड्डी श्रीकांत (वय-32 रा. हैदराबाद) याच्यावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.