Pune Pimpri Chinchwad Crime News | कामगारांचा पीएफ न जमा केल्याप्रकरणी हॉटेलच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल; बालेवाडीतील प्रकार

0

पिंपरी : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून कपात करुन घेतलेली भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund) रक्कम पीएफ कार्यालयात जमा न करता कामगार व शासनाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी वायरोका हॉटेल्स Vairoka Hotels (रमाडा Ramada) च्या दोन संचालकांवर (Director) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 ते जानेवारी 2023 या कालावधीत बालेवाडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 56 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरुन वैभव लांबा व शरद श्रीमंत यादव यांच्यावर आयपीसी 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बेंगलोर महामार्गावरील (Mumbai Bangalore Highway) बालेवाडी येथील वायरोका हॉटेल्सच्या आरोपी संचालकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून पीएफ च्या रक्कमेची कपात केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मात्र, कामगारांच्या पगारातून कपात केलेली 38,968 रुपये रक्कम आरोपींनी भविष्य निर्वाह निधी कार्य़ालय पुणे येथे
भरली नाही. कामगारांच्या पगारातून कपात केलेली रक्कम स्वत:च्या आर्थिक फायदासाठी वापरुन कामगार व शासनाचा
विश्वासघात केला. आरोपींनी पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खटाळ (API Khatal) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.