NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

नागपूर : NCP Ajit Pawar Group | उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislature Winter Session Nagpur) सुरू होत असून यामध्ये राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मात्र, अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादीच्या दोन गटात वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी नागपूर विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय हे अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Group) देण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी अधिवेशन काळात नागपूर विधिमंडळातील राष्ट्रवादीचे कार्यालय आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. अध्यक्षांनी ही मागणी मान्य करत सदर कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या कार्यालयावर अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी लावली आहे.
उद्यापासून सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण (Maratha Reservation),
धनगर आरक्षण (Dhangar Reservation), ओबीसींचा आरक्षणाला (OBC Reservation) असलेला विरोध,
अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचं नुकसान अशा मुद्द्यांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.
परंतु, अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच दोन गटात वादंग लावला गेला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस, भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीकडून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण
- दोन लाख कमिशन देऊन सायबर चोरट्याने घातला साडे आठ लाखांचा गंडा, वडगाव शेरी येथील प्रकार
- कस्टम ड्युटी चार्जेस घेऊन माल न देता पुण्यातील कंपनीची दोन कोटींची फसवणूक, चार जणांवर FIR
- तारण ठेवलेले सोने सोडवण्याच्या बहाण्याने फायनान्स कंपनीची फसवणूक, वाघोली येथील प्रकार
- पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेला 50 लाखांचा गंडा
- लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल