PSI- Cop Dismissed In Pune | पुण्यात महिला पोलिस अधिकार्‍यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – PSI- Cop Dismissed In Pune | ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याला ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) पळून जाण्यास मदत करुन पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे (PSI Mohini Dongre) आणि सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे (Police Ramesh Kale) यांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे. ललित पाटील पलायन प्रकरणी (Lalit Patil Escape Case) आतापर्यंत चार जण पोलीस सेवेतून बडतर्फ केले गेले आहेत. (PSI- Cop Dismissed In Pune)

ललित पाटील याच्याविरुद्ध अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो ससून रुग्णालयातून पळून गेला होता. यावेळी त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारे नाथाराम काळे (Police Natharam Kale) आणि अमित जाधव (Police Amit Jadhav) यांना यापूर्वी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. (PSI- Cop Dismissed In Pune)

ललित पाटील याला ससून रुग्णालयातील वॉर्ड नं. १६ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोर्ट कंपनीचे देखरेख अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांची तर, गार्ड इन्चार्ज म्हणून सहायक फौजदार रमेश काळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. ललित पाटील पळून गेला, तेव्हा हे दोघेही कामावर उपस्थित नव्हते. त्यांनी बेकायदेशीर, बेशिस्त, बेजबाबदार व पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे गैरवर्तन केल्याने त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याप्रकरणात एकूण ११ जणांना निलंबित (Cops Suspended In Pune) करण्यात आले आहे.
त्यातील चौघांना बडतर्फ केल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.