Pune Crime News | दोन लाख कमिशन देऊन सायबर चोरट्याने घातला साडे आठ लाखांचा गंडा, वडगाव शेरी येथील प्रकार

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | वर्क फ्रॉम होमचे (Work From Home) आमिष दाखवून फ्लाइट बुकिंग टास्क (Flight Booking Task) दिला. टास्क पुर्ण केल्यानंतर सुरुवातीला 2 लाख 5 हजार 788 रुपये कमिशन दिले. यानंतर तरुणाची 8 लाख 49 हजार 646 रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. हा प्रकार वडगाव शेऱी येथे 24 मे ते 30 ऑगस्ट या कालावधीत तरुणाच्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत अंकित नंदकुमार सुपेकर (वय-30 रा. विद्यानगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 70855XXXXX या मोबाईल धारकावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगाराने (Cyber Criminal) फिर्यादी यांना संपर्क साधुन वर्क फ्रॉम होम
देण्याचे आमिष दाखवले. त्यांना टेलीग्राम ग्रुपमध्ये अॅड करुन घेतले. त्यानंतर लिंक देऊन त्यावर लॉगीन करुन
फ्लाइट बुकिंग टास्क दिला. फिर्य़ादी यांनी टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना 2 लाख 5 हजार 788 रुपये कमीशन देऊन
विश्वास संपादन केला. यानंतर पुन्हा फ्लाइट बुकिंग टास्क देण्याच्या बहाण्याने 8 लाख 49 हजार 646 रुपये विविध
बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार अंकित सुपेकर यांनी पैसे जमा केले.
मात्र, त्यानंतर सायबर गुन्हेगाराने फिर्यादी यांना कोणताही टास्क न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior PI Rajendra Landge) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- कस्टम ड्युटी चार्जेस घेऊन माल न देता पुण्यातील कंपनीची दोन कोटींची फसवणूक, चार जणांवर FIR
- तारण ठेवलेले सोने सोडवण्याच्या बहाण्याने फायनान्स कंपनीची फसवणूक, वाघोली येथील प्रकार
- पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेला 50 लाखांचा गंडा
- ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल
- Maharashtra Police News | नशेबाजाकडून दोन पोलिसांना जबर मारहाण