Pune Crime News | कस्टम ड्युटी चार्जेस घेऊन माल न देता पुण्यातील कंपनीची दोन कोटींची फसवणूक, चार जणांवर FIR
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कस्टम चार्जेस (Customs Charges) घेऊन कंपनीला कंटेनर मधील माल न देता दोन कोटी 33 लाख 58 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली आहे. याप्रकरणी दिल्ली येथील कंपनी व कंपनीतील काम करणाऱ्यांवर पर्वती पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 डिसेंबर 2022 ते आजपर्यंत सदाशिव पेठेतील मे. तुनवाल ई मोटर्स प्रा. लि. (Tunwal E Motors Pvt Ltd ) येथे घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत नीरज नारायण दिघे Neeraj Narayan Dighe (वय-32 रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून आर.के. कंटेनगर लाईन प्रा. लि. दिल्ली, सुनिल मिश्रा, प्रमोद पांडे, सुबोध रॉय यांच्यावर आयपीसी 120ब, 406, 409, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर.के. कंटेनगर प्रा. लि. (R.K. Kantenagar Pvt. Ltd.) या कंपनीने तसेच कंपनीत
काम करणाऱ्या इतर तिघांनी फिर्यादी यांच्या कंपनीचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांच्या कंपनीचे साहित्य असलेल्या 12 कंटेनरचा बंदरावरील व्यवहार आरोपींनी पाहणे क्रमप्राप्त होते.
यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीने खर्च दिला होता. असे असताना आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 1 कोटी 44 लाख 22 हजार
445 रुपयांची रक्कम घेतली. तसेच कस्टम ड्युटी चार्जेस 89 लाख 36 हजार 248 रुपये घेतले.
फिर्यादी यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या कंटेनरमधील माल कंपनीला न देता मोठी
आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कामठे (PSI Kamthe) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | तारण ठेवलेले सोने सोडवण्याच्या बहाण्याने फायनान्स कंपनीची फसवणूक, वाघोली येथील प्रकार
- पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेला 50 लाखांचा गंडा
- ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल
- Maharashtra Police News | नशेबाजाकडून दोन पोलिसांना जबर मारहाण