PM Modi Cabinet Meeting | ‘गरिबांना आणखी ५ वर्षे मोफत रेशन’ प्रस्तावाला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ मोठे निर्णय

Pradhan Mantri Garib Kalyan Yojana

नवी दिल्ली : आज झालेल्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (PM Modi Cabinet Meeting) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गरीब कल्याण अन्न योजनेला (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल. तसेच, ड्रोन सखी योजनेलाही (Drone Sakhi Yojana) मंत्रिमंडळाने (PM Modi Cabinet Meeting) मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Minister Anurag Thakur) यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. ठाकूर म्हणाले की, कोविड महामारी काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. ही योजना १ जानेवारी २०२४ नंतर पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे.

ड्रोन सखी योजनेबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ड्रोन सखी योजनेलाही मंजुरी
दिली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशकांची फवारणी केली जाणार आहे. (PM Modi Cabinet Meeting)

ते पुढे म्हणाले, ड्रोन उडवणाऱ्या महिलेला दरमहा १५ हजार रुपये मानधन आणि सहाय्यकाला १० हजार रुपये मानधन
दिले जाईल. ही योजना २०२६ पर्यंत सुरू राहिल. यासाठी एकूण १२६१ कोटी रुपये खर्च होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत १६ व्या वित्त आयोगासाठी ‘टर्म ऑफ रेफरन्स’ला मंजुरी देण्यात आली.
सध्याच्या आयोगाचा कार्यकाळ मार्च २०२६ पर्यंत आहे. तसेच, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत जलदगती
विशेष न्यायालय २०२६ पर्यंत सुरू ठेवण्यास संमती देण्यात आली आहे, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.