MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची सध्याच्या राजकारणावर चौफेर फटकेबाजी! ”नेते लाचार, मिंधे, पैशासाठी वेडे झालेत”

0

कर्जत : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | आपल्याकडचे नेते लाचार, मिंधे झाले आहेत. पैशांसाठी वेडे झाले आहेत. त्यांना तत्त्व कळत नाहीत. त्यांना पाठिचा मनका नाही. स्वाभिमान नाही. आज इकडून तिकडे गेले, उद्या तिकडून इकडे आले. याशिवाय दुसरे काही चालू नाही. घरी गेल्यावर त्यांना कदाचित घरातलेही विचारत असतील आज कुठे आहात? अशी जोरदार टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सध्याचे राजकारण (Maharashtra Political News) आणि राजकीय नेत्यांवर केली.

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मनसेतर्फे सहकार शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, मध्यंतरी मी विधानभवनातील एका कार्यक्रमात गेलो,
तेव्हा मला कळेचना कोण कुठल्या पक्षात आहेत. त्यांनी त्यांची मने आणि स्वाभिमान गहाण टाकलेला आहे.
पण तुम्ही तो टाकू नका. माझ्या मनसे सैनिकांकडून कधीही स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही.

राज्यातील जमिनींवर होत असलेल्या परप्रांतिय आक्रमणावर राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील जमिनी मोठ्या
प्रमाणात बळकवल्या जात आहेत. मराठी माणसाच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही.
रायगड जिल्ह्यात शिवडी न्हावा-शेवा सारखा रस्ता होत आहे. जेव्हा जेव्हा असे मोठे रस्ते झाले, तेव्हा तेव्हा
मराठी माणसाच्या हातातून जमिनी गेल्यात. आपण बेसावध आहोत. तुटपुंज्या पैशांसाठी जमिनी विकून टाकतो.
उद्या रायगड जिल्हा मराठी माणसाच्या हातात राहणार नाही.

रायगडकरांना इशारा देताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले, रायगडमध्ये विमानतळ होत आहे. मुंबईला जोडणारा रस्ता होत आहे. रस्ता आणि विमानतळ झाल्यानंतर बाहेरच्या राज्यातील लोक येऊन इथल्या जमिनी विकत घेणार, तेही इथल्या लोकांच्या नाकावर टीच्चून घेतील.

ते पुढे म्हणाले, हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार. कारण ती बाहेरची माणसे तुमच्याशी बोलायची बंद होणार.
रायगड जिल्ह्यासाठी मी आताच धोक्याची सूचना देऊन ठेवतो. मराठी बांधवांनी सतर्क राहावे.
इथल्या इमारती, जमिनी विकत घेतल्या जात आहेत. ही एकप्रकारची महाराष्ट्राच्या विरोधातली सहकार चळवळ आहे.
उद्या तुमच्या हातातून एक एक गोष्टी निसटतील, तेव्हा फक्त पश्चातापाचा करावा लागेल.

जोतीराव फुले यांचा आदर्श मांडताना राज ठाकरे म्हणाले, महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षण दिले.
पण त्याशिवाय त्यांनी त्यावेळी राज्यातील जमिनी सावकाराच्या घशात जाऊ नये, यासाठी पहिले आंदोलन केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.