Pune News | पुणे : चंद्रकांत पाटील आणि आ. रवींद्र धंगेकर यांना रुपाली चाकणकरांची भाऊबीज

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune News | महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजपा (BJP) नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांना पुण्यातील गंज पेठ येथील कार्यक्रमात ओवाळून भाऊबीज (Bhaubeej) साजरी केली. तसेच या दोन भावांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. (Pune News)

भोई प्रतिष्ठानने गंज पेठेतील अग्निशामक विभागाच्या मुख्य कार्यालयात भाऊबीज कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रवींद्र धंगेकर, आयोजक मिलिंद भोई यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. यावेळी हा राजकीय भाऊबीजेचा कार्यक्रम सुद्धा झाला.

यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या, १६ वर्षापासून अग्निशामक विभागाच्या भाऊबीज कार्यक्रमाला येते. या निमित्ताने सर्वांशी बोलता येते. सार्वजनिक जीवनात काम करण्यास ऊर्जा मिळते.

चाकणकर म्हणाल्या, आज या कार्यक्रमात भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार रवींद्र धंगेकर यांना ओवाळले आहे.
पण माझे बंधू जयंत पाटील यांना डेंग्यू झाला आहेत, ते आजारी आहेत. ते लवकर बरे होतील.
जयंत पाटील यांनी फोन करून मला भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.