Pune Mundhwa Police | पुणे पोलिसांच्या सायकल पेट्रोलिंगचं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Mundhwa Police | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे शहर पोलिसांच्या सायकल पेट्रोलिंग या नाविन्यपुर्ण उपक्रमाचं कौतुक केलं आहे. मंगळवारी चंद्रकांत पाटील हे मुंढवा गाव येथील उमेश गायकवाड यांच्या घरी जात असताना त्यांना मुंढवा पोलिस ठाण्यातील (Mundhwa Police Station)अधिकारी व कर्मचारी हे परिसरात सायकल पेट्रोलिंग करीत असल्याचे दिसले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी थांबुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्याकडून सायकल पेट्रोलिंगमुळे होणार्या फायद्यांची माहिती घेतली. (Pune Mundhwa Police)
अरूंद रस्ते, गल्लीबोळातील रस्ते, रहदारीच्या परिसरात चारचाकी पोलिस वाहनांतून गस्त घालताना मर्यादा येतात, या पार्श्वभुमीवर सायकलवरून गस्त घालणे सोपे होत आहे. या उपक्रमातुन व्हिजिबल पेट्रोलिंग होवून गुन्हयांना प्रतिबंध व नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षितता आदी गोष्टींसाठी मदत होत आहे. सायकल पेट्रोलिंगमुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी हे शारिरीक तंदुरूस्त देखील राहतात. सायकल पेट्रोलिंगचे फायदे सांगितल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane), पोलिस उपनिरीक्षक अनिल बिनवडे, सहाय्यक उपनिरीक्षक रमेश उगले, हवालदार वैभव मोरे, पोलिस नाईक गोकुळ सोडणवर, पोलिस अंमलदार दयानंद गायकवाड, महिला पोलिस स्वाती परभणे यांचे कौतुक केले. (Pune Mundhwa Police)
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनिल कांबळे,
माजी आमदार जगदीश मुळीक, बापुसाहेब पठारे आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे उपस्थित होते.
- Supriya Sule | अखेर गोविंदबागेत शरद पवारांच्या पाठिशी दिसले अजित पवार! सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले फोटो
- Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील ‘जेजुरी’ दौऱ्यावर, नेमकी काय भूमिका मांडणार याकडे पुरंदर तालुक्याचे लक्ष
- Cop Shoot Himself | भाऊबीजेच्या दिवशी अनर्थ, पोलिस कर्मचार्यानं पोलिस वसाहतीत रायफलनं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या
- Pune Crime News | पुणे : पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास
- Sexual Harassment In Ruby Hall Clinic | रूबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणार्या महिलेचा लैंगिक छळ; रूबीच्या एचआर मॅनेजरसह टेक्निशीयनवर विनयभंगाचा गुन्हा दाखल