Pune Crime News | पुणे : पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाचे एक लाख रुपयांचे दागिने हातचलाखीने लंपास केले आहेत. औंध येथील चोंधे पार्क रोडीवर हा प्रकार सोमवारी (दि.13) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी दुचाकीवरील दोघांविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिसांत (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Pune Crime News)
याबाबत भिकु कोंडीबा वाईकर (वय-74 रा. औंध, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन दुचाकीवरील दोघांवर आयपीसी 420, 406, 170 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चोंधे पार्क येथे मॉर्निंग वॉक करुन घरी पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी औंध गावात चोरी झाली असून मी क्राईम युनिटचा पोलीस असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. (Pune Crime News)
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना तुम्ही इतके दागिने घालून फिरू नका असे म्हणून फिर्यादी यांच्याकडून रुमाल घेतला. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन
रुमालात ठेण्याच्या बहाणा करून हातचलाखीने एक लाखाचे दागिने घेऊन पळून गेले.
फसवणूक (Cheating Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यानंतर
ज्येष्ठ नागरिकाने पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाळके (PSI Chalke) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | पुणे : सोसायटीची जागा स्वतःची असल्याचे सांगितले, पैसे घेऊन तरुणाची आर्थिक फसवणूक; दाम्पत्यावर FIR
- ACB Trap News | लाच स्वीकारताना पोलीस हवालदार व झिरो पोलीस अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…