Pune Lok Sabha | पुण्यात ठाकरेंच्या सभास्थळावरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद?, धंगेकरांच्या प्रचारापेक्षा आगामी निवडणुकांचा विचार जास्त

0

पुणे : Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, धंगेकरांच्या प्रचाराचे नियोजन करताना काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात (Shivsena UBT) आगामी निवडणुकांच्या मोर्चेबांधणी वरूनच जास्त वादावादी होताना दिसत आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा कुठे घ्यायची यावरून दोन्हीकडील पदाधिकाऱ्यांमध्ये ‘तू तू मै मै’ सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची कोथरूडमध्ये सभा (Kothrud Sabha) घेण्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे. कोथरुडमध्ये सभा घेतली तर येत्या काळात विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत (PMC Elections) कोथरुडच्या जागेची (Kothrud Vidhan Sabha) मागणी शिवसेना करू शकते, असे वाटत असल्याने कोथरुडमध्ये सभा घेण्याला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.

रवींद्र धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा, रोड शो घेण्यासाठी सध्या नियोजन सुरू आहे. याबाबतचे निर्णय घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, या बैठकांमध्येच पदाधिकाऱ्यांमध्ये धूसफूस होत असल्याचे वृत्त आहे.

विशेष म्हणजे सर्व सभा किंवा रोड शो फक्त धंगेकरांच्या प्रचारासाठीच नाही तर येत्या विधानसभा (Vidhan Sabha Election In Maharashtra) आणि महापालिका निवडणुकीची गणिते समोर ठेवून सभेचे किंवा रोड शोचे आयोजन करण्यात येत आहे. थोडक्यात पदाधिकाऱ्यांना धंगेकरांच्या प्रचारापेक्षा आगामी निवडणुकांची जास्त काळजी वाटत आहे.

उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची सभा कोथरूड विधानसभा मतदारसंघात घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. येत्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून जागेसाठी दावा केला जाईल, असे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच संगमवाडी, बोपोडी, मुळा रोड परिसरात आयोजित केलेल्या पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या सभेवरुनही वाद झाल्याचे समजते.

विशेष म्हणजे पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर पुण्यातील ठाकरे गटाने विधानसभेसाठी कसबा मतदारसंघ देण्याची मागणी केली होती. हा मतदारसंघ दिला तरच रवींद्र धंगेकरांचा प्रचार करु, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती.

यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघ देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच प्रचारात सहभागी होणार असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर ठाकरे गट रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात उतरला. आता रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते पुण्यात येणार आहेत. त्यावरुन देखील कॉंग्रेस आणि ठाकरे गटात वादवादी सुरूआहे.

Leave A Reply

Your email address will not be published.