Supriya Sule – Pune Traffic Jam | पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुप्रिया सुळेंनी असा काढला मार्ग, चक्क दुचाकीचा आधार घेत गाठले इच्छित स्थळ, PHOTO व्हायरल

0

पुणे : Supriya Sule – Pune Traffic Jam | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना काल प्रचार करताना पुण्यातील वाहतुक कोंडीचा चांगलाच फटका बसला. परंतु, पुढील प्रचाराला उशीर होत असल्याचे लक्षात येताच सुप्रिया सुळे त्यांच्या गाडीतून उतरल्या आणि दुचाकीवर लिफ्ट मागून त्या पुढे निघाल्या.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच उमेदवार सध्या धावपळ करताना दिसत आहेत. गावभेटी, कॉर्नरसभा, नागरिकांच्या भेटीगाठी, प्रचारफेरी अशा विविध माध्यमातून उमेदवार प्रचार करत आहेत. हा प्रचार करत असताना कडक उन्हासह वाहतुक कोंडीचा देखील सामना उमेदवारांना करावा लागत आहे.

पुण्यात संध्याकाळी वाहतुक कोंडी ही मोठी समस्या झाली आहे. याचाच फटका काल बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना बसला. पण कोणत्याही परिस्थितीत प्रचाराच्या पुढील स्थळी पोहचण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी वाहतूक कोंडीत चक्क दुचाकींचा सहारा घेतला आणि त्या इच्छित स्थळी पोहचल्या.

पुण्यातील नवले पुल (Navale Bridge) परिसरात सायंकाळी प्रचंड वाहतुक कोंडी असते. काल सायंकाळी सुप्रिया सुळे यांच्या गाड्यांचा ताफा या कोंडीत अडकला. सुप्रिया सुळे यांचा ताफा पुढे जाऊ शकत नव्हता. यानंतर सुप्रिया सुळे गाडीतून उतरल्या आणि त्यांनी थेट एका महिला दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेत त्या पुढे निघून गेल्या.

बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची यावेळची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयीमधील लढत सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.