Discover Excellence: New Zealand Education Showcase | “डिस्कव्हर एक्सलंस: न्यूझिलेंड एज्युकेशन शोकेस” न्यूझिलेंडमधील अग्रगण्य विद्यापीठे व संस्थांशी पुण्यातील संस्थांना जोडते

0

पुणे : Discover Excellence: New Zealand Education Showcase | न्यूझिलेंडमधील शैक्षणिक संधींसाठी सहाय्य करणाऱ्या न्यूझिलेंड गेटवे एज्युकेशन अँड मायग्रेशन एलएलपी या विशेषज्ञ संस्थेने पुण्यात नुकतेच “ डिस्कव्हर एक्सलंस : न्यूझिलेंड एज्युकेशन शोकेस ”चे यशस्वी आयोजन केले. न्यूझिलेंडमधील शैक्षणिक अनुभव जगासमोर मांडण्यासाठी जबाबदार असलेल्या ‘न्यूझिलेंड मानापू की ते आओ’ या सरकारी संस्थेच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात न्यूझिलेंडमधील अग्रगण्य शैक्षणिक संस्था तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांचे प्रतिनिधी एकत्र आले.

हे प्रदर्शन 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते आणि यात अॅकेडेमिक व्यावसायिक तसेच महत्त्वाचे भागधारक यांच्यात संपर्क साधण्यासाठी मदत करण्यात आली. उच्च शिक्षणासाठी एक महत्त्वाचे स्थान म्हणून न्यूझिलेंडला पुढे आणणे, यावर यात भर देण्यात आला. यात सहभागी व्यक्तींना न्यूझिलेंडच्या सर्वोच्च मानांकित विद्यापीठे व संस्थांच्या प्रतिनिधींशी तसेच एज्युकेशन न्यूझिलेंड मानापू की ते आओ संस्थेच्या सरकारी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाची सुरूवात अर्ध्या दिवसाच्या गतिमान चर्चासत्राने झाली. न्यूझिलेंड मध्ये उपलब्ध असलेल्या असाधारण दर्जाच्या शिक्षणावर यात भर देण्यात आला. भारत आणि न्यूझिलेंडच्या शैक्षणिक संस्थांमध्ये संभाव्य सहकार्य व भागीदारी यावर ही चर्चा केंद्रीत होती. शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य केल्यामुळे होणारे परस्पर फायदे यात अधोरेखित करण्यात आले.

या चर्चासत्रानंतर एक खास शैक्षणिक प्रदर्शन झाले. यात पुण्यातील (विद्यार्थ्यांची संख्या) विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची आणि न्यूझिलेंड गेटवेच्या तज्ज्ञांच्या चमूकडून समुपदेशन प्राप्त करण्याची संधी मिळाली. तीन परवानाधारक इमिग्रेशन सल्लागार, इमिग्रेशन व शिक्षणतज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील चमूकडून उपस्थितांना आपल्या आवडीनिवडी व करिअरच्या उद्दिष्टांनुसार परदेशातील अभ्यासक्रम निवडण्याचे मार्गदर्शन मिळाले.

अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, एमआयटी वर्ल्ड पीस स्कूल्स, द लेक्सिकॉन ग्रुप, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, ट्रिनिटी ज्युनियर कॉलेज, एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल, विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स यांच्यासहित पुण्यातील संस्थांच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी या प्रदर्शनात सक्रिय भाग घेतला. जागतिक शैक्षणिक संपर्क वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधींमध्ये प्रवेश देण्यासाठी आपली कटिबद्धता त्यांनी दाखवून दिली.

“डिस्कव्हर एक्सलन्स: न्यूझिलेंड एज्युकेशन शोकेस”मधून आंतरराष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारत आणि न्यूझिलेंडमधील अर्थपूर्ण भागीदारी सुलभ करण्यासाठी न्यूझिलेंड गेटवेच्या निष्ठेचे उदाहरण दिसून येते. न्यूझिलेंडमधील विद्यापीठे आणि संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रदर्शनातून उपस्थितांना विविध विषयांमध्ये उपलब्ध असलेल्या समृद्ध शैक्षणिक संधींची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

न्यूझिलेंड गेटवेचे संस्थापक संदीप जानी म्हणाले,”भारत आणि न्यूझिलेंडमधील शैक्षणिक अग्रणींना एकत्र आणणारे हे सहकार्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आम्हाला आनंद होत आहे. पुण्यातील शैक्षणिक समुदायाकडून मिळालेल्या उत्साहपूर्ण प्रतिसादातून हे अधोरेखित होते, की न्यूझिलेंडच्या शैक्षणिक संधींमध्ये स्वारस्य वाढत आहे आणि प्रभावी भागीदारीची मोठी क्षमता आहे.”

“या कार्यक्रमाच्या यशामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात भारत व न्यूझिलेंड यांच्यातील वाढत्या समन्वयावर प्रकाश पडत आहे. डिस्कव्हर एक्सलन्स: न्यूझीलंड एज्युकेशन शोकेस सारख्या उपक्रमांमुळे दोन्ही देशांतील शैक्षणिक संबंध दृढ होण्यास मदत मिळते. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर शैक्षणिक उत्कृष्टता गाठण्याची शक्ती मिळते, असे न्यूझिलेंड गेटवेच्या पूर्व आशिया आणि भारताच्या डायरेक्टर ऑफ एगेंजमेंट कु. जुगनू रॉय यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.