PM Kisan | PM किसान योजनेत मोठा बदल ! 12.44 कोटी शेतकऱ्यांवर होणार थेट परिणाम, कारण आता ही सुविधा झाली रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | PM किसान सन्मान निधी योजना 2022 (PM Kisan Samman Nidhi Yojana) मध्ये मोठा बदल (big change) करण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम 12 कोटी 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर होणार आहे. हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा उत्तर प्रदेश, पंजाब सह 5 राज्यांमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून 10 फेब्रुवारीपासून मतदानालाही सुरुवात होत आहे. या बदलामुळे आता लाभार्थ्यांकडून एक खास सुविधा काढून घेण्यात आली आहे. (PM Kisan)
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) सुरू झाल्यापासून आतापर्यंत 7 बदल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी, लाभार्थ्यांना ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले होते, तथापि ते काही दिवसांसाठी स्थगित केले गेले आहे. झालेल्या बदलामुळे लाभार्थ्यांच्या काही गैरसोय होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी पोर्टलनुसार आता नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या 12.44 कोटी झाली आहे.
काय बदल झाले आहेत ?
या योजनेत मोठा बदल करून मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक सरप्राइज दिले होते. तो बदल असा होता की नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस स्वतः तपासू शकत होते. जसे की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुमच्या बँक खात्यात किती हप्ता आला आहे इ. तसेच पीएम किसान पोर्टलला भेट देऊन कोणताही शेतकरी त्याचा आधार क्रमांक, मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्टेट्सची माहिती पाहू शकत होता. परंतु नवीन बदलांमुळे, तुम्ही पीएम किसान पोर्टलवर मोबाईल नंबर वरून तुमचे स्टेटस पाहू शकणार नाही. आता तुम्ही फक्त तुमच्या आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकावरून स्थिती जाणून घेऊ शकाल.
बदलाची गरज का होती ?
मोबाईल नंबरवरून स्टेटस चेक करण्याची सोय खूप सोईस्कर होती यात शंका नाही.
परंतु त्याचा गैरफायदा हि खूप होऊ लागला. वास्तविक, अनेक लोक कोणाचाही मोबाईल नंबर टाकून स्टेटस तपासायचे.
अशा परिस्थितीत इतर लोकांना शेतकर्यांची बरीच माहिती मिळायची.
परंतु आता तुम्ही मोबाईलवर स्टेट्स चेक करू शकत नाही.
Web Title :- PM Kisan | big change in pm kisan yojana direct impact on 12 crore 44 lakh farmers because now this facility has been abolished
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी सर्व स्कूल बसचा ‘वाहन कर’ माफ
Aadhaar Card | कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तुमचे आधार कार्ड, एका क्लिकमध्ये असे घ्या जाणून