Aadhaar Card | कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तुमचे आधार कार्ड, एका क्लिकमध्ये असे घ्या जाणून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card | 2009 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने (UPA Government) भारतात आधार कार्ड (Aadhaar Card) योजना सुरू केली. यानंतर, सरकारने त्याचा वापर सातत्याने केला आहे. देशात वेगाने वाढणार्या डिजिटलायझेशन (Digitalization) च्या युगात आधार कार्डची उपयुक्तता झपाट्याने वाढली आहे. आजकाल मुलांचे आधार कार्ड शाळेतच बनवले जाते.
हॉटेल बुकिंग (Hotel Booking) पासून ते हॉस्पिटल (Hospital) आणि सरकारी कामांपर्यंत सर्वच ठिकाणी आजकाल आधार कार्डचा वापर केला जात आहे. आधार कार्डाशिवाय कोणतेही महत्त्वाचे काम करणे अवघड आहे.
हे सरकारी विभाग युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI (Unique Identification Authority of India) द्वारे जारी केले जाते. हे केवळ ओळखपत्र नाही तर विविध सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ घेण्यासही उपयोगी आहे. सरकारने बँक खात्यांशीही आधार लिंक (Bank Account Aadhaar Linked) करणे अनिवार्य केले आहे. (Aadhaar Card)
अनेकवेळा असे दिसून येते की लोकांना त्यांचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक केले आहे हे देखील माहित नसते. यामुळे ही माहिती घेण्यासाठी त्यांना बँकेच्या अनेक फेर्या माराव्या लागतात.
पण, ही माहिती तुम्ही घरबसल्या मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला त्या सोप्या स्टेप्सबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार लिंक (Aadhaar Linked Bank Account) असलेल्या बँक खाते क्रमांकाची माहिती मिळवू शकता.
असे तपासा –
– सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर क्लिक करा.
– यानंतर Check Your Aadhaar and Bank Account या लिंकवर क्लिक करा.
– या नंतर, आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका.
– यानंतर तुमच्या Registered मोबाईल नंबरवर OTP येईल जो एंटर करा.
– त्यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
– लॉग इन करताच आधारशी संबंधित सर्व बँक खाती तुमच्या समोर येतील.
– येथे तुम्ही लिस्ट सहज पाहू शकता.
Web Title :- Aadhaar Card | aadhaar card check which bank account have been linked to aadhaar check in few seconds
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव