Muralidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

0

पुणे – Muralidhar Mohol | शेतकरी, कामगार या दोन्ही घटकांना गेल्या पंच्याहत्त्तर वर्षात काँग्रेस सरकारने (Congress Govt) फारसे महत्व न देता कामगारांच्या संघटित ताकदीचा उपयोग फक्त सत्ता मिळवण्यासाठी केलेला बघायला मिळतो. अशा परिस्थितीत केंद्रात सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्या पाच वर्षात जवानांनांसाठी, गेल्या पाच वर्षात शेतकरी, कामगार, श्रमजीवींसाठी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगार, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे असल्याने त्यांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी, असे आवाहन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे (Mahayuti) पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केले. (Pune Lok Sabha Election 2024)

महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे होते. कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. शहर सरचिटणीस बापू मानकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ, अनुप मोरे, नामदेव माळवदे, बाळासाहेब टेंमकर, उमेश शहा आदी पदाधिकारी व मान्यवर मेळाव्याला उपस्थित होते.

‘आपला देश तरूणांचा देश आहे. या युवा शक्तीच्या जोरावार विकसित भारताचे स्वप्न मोदीजींनी बघितले आहे, असे सांगून मोहोळ म्हणाले, ‘विकसित भारतासाठी देशाने संघटित होणे गरजेचे आहे. देशातील कामगार शक्ती ही मोठी संघटित शक्ती असून या संघटन शक्तीच्या जोरावारच देशात औद्योगिक क्रांती कामगारांनी यशस्वी करून दाखवली आहे. आता बदलता काळ आणि विकसित होणारे तंत्रज्ञानाला श्रमांची जोड मिळणे गरजेचे आहे.

शहरध्यक्ष घाटे म्हणाले, ‘ही निवडणूक प्रत्येक देशवासीयांचे आणि आपल्या घरातील भावी पिढीचे भवितव्य ठरवणारी असल्याने प्रत्येक देशवासियांच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत होणारे मतदान हे कोणा उमेदवार किंवा पक्षासाठी होणार नाही, तर देशासाठी केलेले मतदान असणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात जशी कामगार शक्तीने महत्वाची भूमिका बजावली होती, तशीच भूमिका बजावण्याची वेळ पुन्हा या निवडणुकीच्या निमित्ताने आलेली आहे. फरक फक्त इतकाच आहे की, यावेळी मतदानातून स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करावयाची ही क्रांती आहे. त्यामुळे कामगारावर्गानेही मतदारांपर्यत पोचण्याची गरज आहे. ही जबाबदारी कामगारबंधू आनंदाने पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.