Pune Crime | पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ, हल्लेखोरांची नावे निष्पन्न

0

पुणे : एन पी न्यूज 24  – Pune Crime | पुण्याच्या लोणीकंद (Lonikand) परिसरात आज (बुधवार) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुहेरी खुनाची (Double Murder in Pune) घटना घडली आहे. मारेकर्‍यांनी कोयता, बेसबॉल आणि दगडाने ठेचून बाप-लेकाचा खून (Murder in Pune) केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यातील (Lonikand Police Station) पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी घटनास्थळी (Pune Crime) धाव घेतली आहे.

सनी कुमार शिंदे Sani Kumar Shinde (22), कुमार शिंदे Kumar Shinde (55) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. सनी हा कुमार शिंदे यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी एका खून प्रकरणात सनी शिंदे यास अटक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासुन तरूंगात असलेल्या सनीची 3 महिन्यापुर्वी जामिनावर मुक्तता झाली. तो तरूंगाच्या बाहेर आला. आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील शाळेच्या पाठीमागे अज्ञात हल्लेखोरांनी सनी शिंदेला गाठले. त्यावर कोयता, बेसबॉलने हल्ला (Pune Crime) चढविला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर देखील हल्लेखोरांनी त्याला दगडाने ठेचण्यास सुरूवात केली.

सनीचे वडिल कुमार शिंदे तेथे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. हल्लेखोरांच्या हल्ल्यात सनी आणि कुमार शिंदे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे पिता-पुत्राचा खून हा पुर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. लोणीकंद पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Double Murder in Lonikand area of Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेचे पैसे ‘या’ शेतकऱ्यांना परत करावे लागणार; जाणून घ्या

Pune Corona Updates | अत्यंत चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4857 नव्या रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona Updates | चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये 1500 गुंतवणूक केल्यास तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल, जाणून घ्या कसे

Leave A Reply

Your email address will not be published.