Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार

0

मुंबई :  एन पी न्यूज 24  – Thackeray Government | राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व दुकानांच्या (Shops) पाट्या मराठीत (Marathi) मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet) बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दुकानाच्या पाट्या (All Shop Signs) आता मराठीमध्येच (Marathi Signs) दिसणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (बुधवारी) मराठी भाषेविषयी निर्णय घेण्यात आला आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना आणि दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आलं होतं. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्याचबरोबर उपाययोजना करण्याचीही मागणी केली जात होती. अखेर याबाबत निर्णय आज घेतला गेला आहे.(Thackeray Government)

दरम्यान, मंत्रीमंडळाने आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा आणि पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने आणि व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.

 

Web Title :-  Thackeray Government | now all shop signs have be done marathi big decision maharashtra Thackeray government

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये 1500 गुंतवणूक केल्यास तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल, जाणून घ्या कसे

Supreme Court On Dowry | सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ! सासरकडून पैसा किंवा मागितले जाणारे कोणतेही सामान हुंडा मानला जाईल

जर सर्व कागदपत्रे नसतील तरीही Ration Card मध्ये आपल्या मुलाचे नाव नोंदवू शकता, जाणून घ्या पद्धत

Pune Crime | बनावट फेसबुक अकाऊंटवर महिलेची बदनामी अन् आत्महत्येची धमकी; बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास

Pune Crime | पुण्यात टिळक रस्त्यावर भरदिवसा तरुणीसमोर ‘हस्तमैथून’ करणारा CCTV त कैद, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Leave A Reply

Your email address will not be published.