Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट आजचे दर

0

मुंबई : एन पी न्यूज 24  – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी स्वस्त मिळत आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,610 रुपये पर्यंत कमी आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,700 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर (Gold Silver Price Today) उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी देखील दिसून येत आहे. त्याचबरोबर गतवर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा भाव कमी आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचे सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,650 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,610 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,610 रुपये

आजचा चांदीचा भाव – 60,700 रुपये (प्रति किलो).

Web Title :- Gold Silver Price Today | Gold silver rate in india today on 10 january 2022 sonya chandi che dar

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

Omicron Positive | ओमिक्रॉन पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर होऊ नका अस्वस्थ, आवश्य करा ‘हे’ 4 उपाय; जाणून घ्या

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने ‘या’ आजारांचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या कसे करावे नियंत्रण

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.