‘या’ घरगुती उपायांनी चुटकीसरशी दूर होतील आरोग्य समस्या

0

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन – काही घरगुती उपाय हे अनेक आरोग्य समस्या चुटकीसरशी दूर करतात. तसेच अशा छोट्या-छोट्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही. अनेक घरगुती टिप्स आपल्याला माहित असतात. परंतु, त्यामागील विज्ञान माहित नसते. अशा पदार्थांचा वापर आणि त्यामागील विज्ञान माहिती असणे जरूरी आहे.

मेथी दाणे
मेथी दाण्यांमध्ये भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. यामुळे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. तसेच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते.

गाजर
गाजराचे नियमित सेवन केल्यास डोळे निरोगी राहतात. यामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. जेवणात अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच दृष्टी कमकुवत होते. अ जीवनसत्त्व असलेल्या खाद्य पदार्थांचे सेवन केल्यास डोळे नेहमी निरोगी राहतात.

लवंग तेल
लवंगेत युजेनॉल हा एक सुगंधित घटक असतो. तो वेदनांची अनुभूती देणारा रिसेप्ट म्हणजेच नॉसिसेप्टर्सची संवेदनशीलता कमी करतो.

टूथपेस्ट
मधमाशी चावल्यानंतर त्वचेत अनेक विषारी पदार्थ इंजेक्ट होतात. यामुळे तीव्र वेदना होतात आणि सूज येते. अशावेळी त्या जागेवर थोड्या वेळासाठी टूथपेस्ट घासावी. यामुळे विषारी पदार्थाचा परिणाम कमी होतो. टूथपेस्टमधील ग्लिसरीन त्वचेतील विषारी पदार्थांचा परिणाम नष्ट करते.

Visit : NPNews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.