हातांचे सौंदर्य वाढविणाऱ्या मेंदीमुळे अनेक रोगही बरे होऊ शकतात

0

एन पी न्यूज 24 :  शेकडो वर्षांपासून आपल्याकडे मेंदी लावण्याची परंपरा आहे. सर्वच वयातील महिला मंगलकार्यात हात व पायांवर मेंदी आवर्जून काढतात. भारताच्या सर्वच भागात मेंदी लावण्याची ही प्रथा रूजलेली आहे. अशाप्रकारे हातांचे सौंदर्य वाढविणारी मेंदी औषधी गुणधर्मांनी सुद्धा युक्त आहे. या मेंदीचा वापर करून अनेक आजार बरे केले जाऊ शकतात.

हे आहेत उपयोग
* शरीराचा कुठलाही भाग भाजला असल्यास त्यावर मेहंदी लावल्याने आग कमी होते.

* पोटाच्या आजारावरही मेंदी फायदेशीर आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये मेहंदीचा वापर केला जातो. मेंदीचे सेवन केल्याने कसलेही साइड इफेक्ट होत नाहीत.

* निरागी केसांसाठीही मेहंदी उपयोगी आहे. १०० ग्रॅम मेंदीमध्ये आवला, शिकाकाई पावडर, आणि रिठा एकत्र करून एक तास भिजवून ही पेस्ट केसांना लावावी. यामुळे कोंडा जातो. केस गळतीही कमी होते. केस चमकदार आणि निरोगी होतात.

* मेंदीची पाने रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील फोड लवकरच कमी होतात.

* मेहंदीच्या पानांची पेस्ट करून लावल्याने दाढ दूखी कमी होते.

* खोबरेल तेलात मेंदी एकत्र करून लावल्याने तळपायाच्या भेगा कमी होतात.

* मेंदी किटाणू आणि बुरशीचा नाश करते. शरीराचे तापमान नियंत्रीत ठेवते. त्यामुळे उष्णतेमुळे होणारी पायांची आग कमी होते.

* नखांवर मेंदी लावण्याने नखांची चमक वाढते.

* मेंदीची पाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी हे पाणी प्यायल्यास काविळ बरी होते.

* शाहजीरे आणि मेंदीचे बी एकत्र करून त्याची पूड करावी. हे चूर्ण पाण्यात मिसळून डोक्यावर लेप लावल्यास डोकेदूखी कमी होते.

* जखमेमुळे सूज असल्यास मेंदीत हळद एकत्र करून लावल्याने सूज कमी होते.

* मेंदीत कांद्याचा रस मिसळून तळपायांवर लावल्याने उन्हाळी लागण्याच्या त्रासात आराम मिळतो.

* मेंदीची पाने वाटून लावल्याने सर्व प्रकारच्या वेदना कमी होतात.

Visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.