Room Heater Side Effects | हिवाळ्यात रूम हीटर वापरा जपून, नाहीतर एका चूकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव…

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन  टीम – सर्वत्र आता हिवाळा सुरू झाला असून, येत्या काही दिवसांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे (Room Heater Side Effects). त्यामुळे अनेक लोकांनी आपल्या घरांसाठी रूम हिटर वापरायला सुरूवात केली आहे. थंडीच्या वातावरणात रूम हीटर लावून बसल्याने खूप आराम मिळतो. रुम हिटरचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र डॉक्टरांच्या मते रूम हीटरचा (Room Heater) कमी वापर करावा. कारण याच्या अतिवापराने यात गंभीर धोका होऊ शकतो. तसेच चुकूनही हीटर रात्रभर चालू ठेवू नये, अन्यथा ते जीवघेणे असू शकते. गेल्या काही वर्षांत रूम हिटरमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे ते जबाबदारीने वापरले पाहिजे (Room Heater Side Effects).

डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात रूम हीटर जपून वापरावे. रूम हीटर फक्त कमी कालावधीसाठी चालू ठेवावे. रात्री हीटर लावून झोपण्याची चूक कधीही करू नये. अन्यथा ते जीवघेणे ही ठरू शकते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या खोलीतील वायुवीजन योग्य नसेल, तर रात्रभर हीटर चालवल्याने खोलीत कार्बन मोनोऑक्साइड वायू भरतो आणि ऑक्सिजन (Oxygen) कमी होऊ शकतो. त्यामुळे झोपेत असताना श्वासोच्छवास बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा चुका करणे टाळावे. रूम हीटरचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी ह्युमिडिफायरचा (Humidifier) वापर केला जाऊ शकतो. दमा आणि श्वसनाच्या रुग्णांनी शक्य तितक्या कमी प्रमाणात हीटर चालवावा.

v जाणून घेऊया रुम हीटर चालवण्याचे 5 गंभीर तोटे (Room Heater Side Effects)

1 . तज्ज्ञांच्या मते, रूम हीटर खोलीतील हवा कोरडे करण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. आधीच कोरडी त्वचा (Dry Skin) असलेल्या लोकांनी रूम हीटर पूर्णपणे टाळावे.
2 . रुम हीटर जास्त चालवल्याने डोळ्यांवर परिणाम होतो. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा (Dryness In Eyes) आणि जळजळीची भावना (Burning Sensation In Eyes) होऊ शकते.
असे झाल्यास, हीटर ताबडतोब बंद करा.
3 . काही लोकांना रूम हीटरची ऍलर्जी देखील असते.
त्यातून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे नाकही कोरडे होऊ शकते.
4 .  दमा (Asthma) किंवा श्वसनाच्या रुग्णांनी रूम हीटरमध्ये जास्त वेळ राहू नये.
अन्यथा खोलीतील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
5 . रूम हीटर मधून निघणारा कार्बन मोनोऑक्साइड (Carbon Monoxide)
वायू आरोग्यासाठी धोकादायक असतो.
यामुळे रूम हीटरचा दीर्घकाळ वापर टाळावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.