Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन – आपल्या निरोगी शरीरासाठी ज्याप्रमाणे सकस आणि पौष्टिक आहाराची गरज असते (Brain Health). त्याचप्रमाणे आपल्या मेंदूचे कार्य चांगले रहावे यासाठी आपल्याला अनेक पोषक तत्त्वांची आवश्यकता आहे. तसेच हिवाळ्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेक पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केल्याने मेंदू सुधारण्यास मदत होते (Brain Health).

आपला मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपल्याला विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ती मेंदू देतो. जाणून घेऊया मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत (Brain Health).

बदामामध्ये (Almonds) व्हिटॅमिन ई (Vitamin E), ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् (Omega 3 Fatty Acid), अँटिऑक्सिडंट्स (Antioxidant) आणि प्रथिने (Protein) यांसारखे पोषक घटक आढळतात. हे सगळे पोषक घटक मेंदूच्या पेशींचे (Brain Cells) नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
ब्लूबेरी (Blueberry), स्ट्रॉबेरी (Strawberry), ब्रोकोली (Broccoli) आणि गाजर (Carrot) यासारख्या भाज्यां मेंदूच्या
पेशींचे संरक्षण करणारे अँटीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय ओमेगा-३ फॅटी अॅसिडही मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे.
अंड्यांमध्ये (Egg) कोलीन (Choline) नावाचे पोषक तत्व असते. त्यामुळे मेंदूच्या पेशींची वाढ आणि कार्य सुधारते.
हे न्यूरोट्रांसमीटर म्हणून काम करते. अंड्यांमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात.
ज्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते. तसेच हिवाळ्यात अंडी जरूर खावीत.
दुधामध्ये (Milk) कॅल्शियम (Calcium), प्रथिने, व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) आणि व्हिटॅमिन डी (Vitamin D)
सारखे पोषक घटक असतात. जे मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी (Brain Development) आणि कार्य
(Brain Function) करण्यासाठी आवश्यक असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.