हे वाचलंत तर कधीही फेकणार नाही केळीची साल, आरोग्यासाठी उपयोगी

0

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन – मधूर चव असलेली केळी सर्वांनाच आवडतात. बाजारात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे केळी होय. दररोज एक तरी केळ खावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ सुद्धा देतात. कारण, केळीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन असतात. केळीच्या सेवनाने विविध आजारांना दूर ठेवणे शक्य आहे, असे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु, केवळ केळच नव्हे, तर केळाची सालही आरोग्यासाठी उपयोगी आहे. म्हणूनच केळ खाऊन साल कधीही फेकू नका. केळीच्या सालीचे अनेक खास उपाय आहेत. हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत सालीचे फायदे
शरीरात एखाद्या भागात वेदना होत असतील तर त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळीची साल लावावी, आराम मिळतो.

हलक्या हाताने केळीच्या सालीने चेहऱ्यावर पाच मिनिटांपर्यंत मालिश केल्यास पिंपल्स नष्ट होण्यास मदत होते. या सालीची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो.

केळीच्या सालीने दात घासल्यास दात चमकतात.

मधमाशीने, किड्याने दंश केल्यास त्याठिकाणी केळीची साल बारीक करून लावल्यास आराम मिळतो.

सोरायसिस झाल्यास त्यावर केळीची साल बारीक करून लावावी. यामुळे डाग निघून जातील.

डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर केळीची साल थोडावेळ डोळ्यावर ठेवावी.

चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास अंड्याच्या बलकामध्ये केळीची साल मिसळून लावल्यास सुरकुत्या नष्ट होतात. ही पेट ५ मिनिट लावून ठेवावी, त्यानंत चेहरा स्वच्छ धुवावा.

हे आहेत केळीचे फायदे
सतत मानसिक ताण असल्यास केळी आवर्जून खावीत.

केळामध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज तत्व असल्याने केळ खाल्ल्यानंतर लगेच एनर्जी मिळते.

कच्च्या केळामध्ये स्टार्च व सेल्युलोज जास्त प्रमाणात असते. केळ पिकले, की या स्टार्चचे रूपांतर सुक्रोज, फ्रुक्टोज व ग्लुकोज या साध्या रेणूंच्या कार्बोहायड्रेट्समध्ये होते. म्हणून कच्चे केळ बद्धकोष्ठतेवर व पिकलेले केळे जुलाबावर गुणकारी आहे.

Visit : NPnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.