हैद्राबाद बलात्कार : ४ आरोपींच्या एन्काऊंटरची चौकशी त्रिसदस्यीय आयोग करणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – हैद्राबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि खूनप्रकरणानंतर पोलिसांनी चार आरोपींचे एन्काऊंटर केले होते. या एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आज तीन सदस्यीय  चौकशी आयोग स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे निवृत न्यायमूर्ती वीएस शिरपुरकर आयोगाचे प्रमुख असतील. तसेच आयोगात मुंबई उच्च न्यायाल्यालयाच्या न्यायाधीश रेखा बालदोता आणि माजी सीबीआय संचालक कार्तिकेयन यांचा समावेश असणार आहे.

सुणावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटले की, या आयोगाला सहा महिन्यात आपला अहवाल सादर करायचा आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने दोन याचिकांच्या सुनावणीप्रसंगी हे आदेश दिले आहेत. या याचिकांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या हैद्राबाद एन्काऊंटरची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निष्पक्ष चौकशीची गरज
न्यायाल्याने याप्रकरणी राज्य सरकारची वेगळी चौकशी करण्याचा आदेश रद्द करताना म्हटले की, याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. लोकांना सत्य समजले पाहिजे. खंडपीठाने म्हटले की, आमचे म्हणणे आहे की, तेलंगणामध्ये महिला डॉक्टरवर झालेला सामुहिक बलात्कार आणि खूनप्रकरण तसेच त्यानंतर झालेल्या एन्काऊंटरची निष्पक्ष चौकशी व्हावी.

या खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. नजीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्नासुद्धा होते. ते म्हणाले की, तेलंगणा सरकारच्या कहाणीचे अनेक पैलू आहेत, ज्यांची चौकशी होण्याची गरज आहे. दरम्यान, तेलंगणा सरकाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी म्हटले की, एन्काऊंटरमध्ये कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागली नसून आरोपींनी केलेल्या हल्ल्यात काही कर्मचारी जखमी झाले होते. 

माध्यमांनाही नोटीस
सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी आदेश देताना म्हटले की, कोणतेही कोर्ट आणि प्राधिकरण आता या प्रकरणाची चौकशी करणार नाही. यावेळी कोर्टाने माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. माध्यमांमुळे फेयर ट्रायलमध्ये अडचणी येऊ शकतात. मात्र, कोर्टाने माध्यमांवर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. वृत्तसंकलानाबाबत माध्यमांना नोटीस जारी केली असून माध्यमांनी वृत्तसंकलन करताना सहकार्य करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

visit : npnews24.com

 

Leave A Reply

Your email address will not be published.