Pune Bibvewadi Murder | नशेत मित्राच्या डोक्यात दगड घालून खून, बिबवेवाडी येथील घटना

0

पुणे : – Pune Bibvewadi Murder | भांडणाच्या रागातून दारुच्या धुंदीत मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. ही घटना अप्पर डेपो जवळ सोमवारी (दि.25) सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आरोपी मित्राला बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) अटक केली आहे. बसवराज गजेंद्र (वय-25 रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, गल्ली नं. 4) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी आतिश शिरसाट (वय-25 रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अप्पर डेपो जवळ नवीन बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीचा सुरक्षा रक्षक अतिश शिरसाट व त्याचा मित्र बसवराज गजेंद्र यांच्यात रविवारी रात्री पार्टी झाली.

सोमवारी धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास त्या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले व दारुच्या धुंदीत आतिश याने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊ आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटणकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.