ठाकरे सरकारचे खातेवाटप ठरले! गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे

Eknath Shinde
12th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे रेंगाळलेले खातेवाटप अखेर मार्गी लागल्याचे वृत्त आहे. ठाकरे सरकारमध्ये गृह आणि नगरविकास ही दोन महत्वाची खाती सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील. मंत्रिमंडळ विस्तारानंतर यापैकी गृहखाते राष्ट्रवादीकडे जाणार असून शिंदे यांच्याकडे नगरविकास कायम राहणार आहे.

गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावरून महाविकास आघाडीचे खाते वाटप रखडले होते. शिवाय यावरून काँग्रेसनेही नाराजी व्यक्त करत इशारा दिल्याचे वृत्त होते. यानंतर बुधवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर प्रमुख खात्यांच्या वाटपावर सहमती झाल्याने आता तातडीने पावले उचलत खातेवापटपाची प्रक्रिया पुर्ण करण्यात येत आहे.

असे असेल संभाव्य खातेवाटप

शिवसेना : नगरविकास, उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, एमएसआरडीसी, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, वन, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य, पाणीपुरवठा, अन्न व औषधी पुरवठा, पर्यटन

राष्ट्रवादी : गृह, सहकार, वित्त, ग्रामविकास, पणन, सामाजिक न्याय, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य. जलसंपदा, अल्पसंख्यांक

काँग्रेस : महसूल, ऊर्जा, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, दुग्धविकास व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण. तसेच (राज्यमंत्री) सहकार, नगरविकास, गृह (ग्रामीण)

visit : npnews24.com