ब्रिटनच्या निवडणुकीत हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तानचा मुद्दा

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील निवडणुकांमध्ये हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तानचा मुद्दा सध्या गाजत आहे. ब्रिटनमध्ये गुरूवारी निवडणुका होणार असून शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहेत. यावेळच्या निवडणुकांमध्ये तेथील दोन प्रमुख पक्ष हे मुळ भारतीय वंशाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे येथील निवडणुक प्रचारात जालियनवाला बाग हत्याकांडपासून कश्मीरचा मुद्दासुद्धा चर्चेत आहे.

या निवडणुकीच्या रणधुमाळीतच बोरिस जॉन्सन यांच्यासाठीचे एक हिंदी गाणेसुद्धा व्हायरल झाले आहे. हे गाणे कंझर्व्हटीव्ह पार्टीचे मुळ भारतीय वंशाचे उमेदवार शैलेश वारा यांनी ट्विट केले होते. ते मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहे. या गाण्यात बोरिस जॉन्सन यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिनच्या विरोधातही उल्लेख आहे.

जागो, जागो, जागो… चुनाव फिर से आया है… बोरिस को हमें जिताना है… इस देश को हमें दिखाना है… कुछ करके हमें दिखाना है, असे हे गाणे आहे. गाण्याच्या व्हिडिओत बोरिस जॉन्सन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दाखवण्यात आले आहे. गााण्याच्या माध्यमातून मोदी समर्थक आणि मुळ भारतीय वंशाच्या लोकांची मते मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोकांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.