पोस्टरवरून कमळ गायब ! पंकजा मुंडेंच्या या उत्तराने उद्याच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष

0

परळी : एन पी न्यूज 24 – राज्यातील भाजप सरकार पायउतार झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. एकनाथ खडसे व अन्य काही नेत्यांसह पंकजा मुंडेसुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे. काही नेत्यांनी उघडपणे तर काहींनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर उद्या होत असलेल्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, या मेळाव्याचे हजारो पोस्टर सर्वत्र लागले असून त्यावरून कमळ मात्र गायब झाले आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया अधिक सूचक आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे यांची उद्या जयंती असून यानिमित्त गोपीनाथ गडावर होत असलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे कार्यकत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या मेळाव्यासह परळीत स्वाभीमान दिनही साजरा करण्यात येणार आहे. याचे पोस्टर सर्वत्र लागले असले तरी पोस्टरवरून कमळ गायब झाले आहे. याबाबत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले असता, इतके दिवस थांबलात, तर आणखी एक दिवस थांबा, असे सूचक उत्तर त्यांनी दिल्याने आता सर्वांचे लक्ष उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोपीनाथ गडाकडे लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.