खुशखबर ! मोबाईल नंबर पोर्टेबलिटी झाली एकदम ‘स्वस्त’, आता फक्‍त ‘एवढ्या’ रूपयांत नंबर करा पोर्ट, जाणून घ्या

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ने मोबाइल ग्राहकांना फायदा करुन देणारा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) करणं स्वस्त होणार आहे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांचा देखील फायदा होणार आहे. ट्रायने ही किंमत कमी करुन फक्त 5.74 रुपये ठेवली आहे. त्यामुळे तुम्ही एकदम कमी किंमतीत पोर्टेबिलिटी करुन घेऊ शकतात. हे नवे दर 30 सप्टेंबरपासून लागू होतील.

ट्रायने एमएनपीच्या नियमात अनेक बदल केले आहेत आणि नव्या किंमती निश्चित केल्या आहेत. ट्रायचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, कॉस्ट रिंबर्समेटच्या अंतर्गत नव्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. या किंमती 30 सप्टेंबरपासून लागू होतील.

दूरसंचार कंपन्यांना होणार लाभ
देशात सर्व कंपन्यांना नंबर पोर्टेबिलिटीसाठी एजेंसीना विविध किंमतीनुसार दर द्यावे लागत होते. परंतू यानंतर कंपन्यांना देखील फायदा होईल. कंपन्या ग्राहकांकडून नंबर पोर्ट करण्यासाठी 19 रुपये एजन्सींना देत होत्या. परंतू आता एअरटेल, वोडफोन, जिओ सारख्या कंपन्या वर्षाला 75 कोटी रुपये वाचवू शकतील.

सरकारने केले बदल
सरकारने वर्षाच्या सुरुवातीला मोबाइल नंबर पोर्टवरील किंमतीत 4 कोटी रुपयांची कपात कली होती. परंतू नंतर उच्च न्यायालयात सिनिवर्स टेक्नोलॉजीने केस दाखल केल्यानंतर नव्या किंमती रद्द केल्या होत्या. रिलायन्सने देखील हा निर्णय परत घेण्यासाठी आवाहन केले होते. त्यानंंतर परत हे दर 19 रुपये करण्यात आले होते. मे 2019 पर्यंत मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी 43.7 कोटी रिक्वेस्ट स्वीकारल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Leave A Reply

Your email address will not be published.