खुशखबर ! सोन्यामध्ये गुंतवणूक करून कमवा ‘बक्‍कळ’ पैसे, 1 रूपयात घरबसल्या खरेदी करा Gold

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोनं खरेदी करणं ही कायमच भारतीयांची पहिली पसंती राहिली आहे. परंतू मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमती वाढत आहेत. परंतू तज्ञांच्या मते आता सोन्यावर पैसे लावणे हा गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे. त्यामुळे चांगला परतावा कमवण्यासाठी गोल्ड ETF मध्ये लोक पैसे लावत आहे. भारतीय मागील काही महिन्यांपासून दागिन्याऐवजी गोल्ड ETF वर पैसे लावत आहे. ऑगस्टमध्ये ही गुंतवणूक 145 कोटी रुपये झाली.

परंतू GOLD ETF वर पैसे लावण्याची प्रक्रिया थोडी अवघड आहे. त्यामुळे याकडे सामान्यांचा ओढा कमी आहे. परंतू आता तुम्हाला सांगितले की तुम्ही फक्त मोबाइलवरुन 1 रुपयात सोनं विकत घेऊ शकतात. तर..

सोने खरेदीसाठी अनेक मोबाइल अ‍ॅप आले आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही सोन्यात गुंतवणूक करु शकतात. गुगलने UPI अ‍ॅप Google Pay च्या माध्यमातून 99.99 टक्के शुद्ध 24 कॅरेट सोने खरेदी करण्याची संधी दिली आहे आणि यात तुम्ही 1 रुपयांपासून सोने खरेदी करु शकतात.

अशी आहे google pay वरुन सोने विकत घेण्याची प्रक्रिया –

1. सर्वात आधी google pay अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यात तुम्हाला Gold Vault म्हणून पर्याय दिसेल. तुम्हाला हा पर्याय दिसत नसेल तर तुम्ही new वर क्लिक करुन gold vault टाइप करु शकतात.
2. Gold Vault वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाय, सेल आणि डिलिवरीचा पर्याय दिसेल.
3. बाय वर क्लिक केल्यावर तुम्हाला mg मध्ये गोल्डचा भाव दिसेल. त्यात वस्तूचा टॅक्स देखील समाविष्ट असेल. तुम्ही कमीत कमी 1 रुपयांचे सोने खरेदी करु शकतात. तुम्ही जेवढ्या किंमतीचे सोने खरेदी करु इच्छितात त्याची रक्कम लिहून क्लिक करा.
4. गोल्डवर लागणारा टॅक्स वेगवेगळा असू शकतो, त्यासाठी तुम्हाला GPS ऑन ठेवावा लागेल.
5. गोल्ड खरेदीच्या प्रक्रियेत सोन्याच्या किंमतीत 5 मिनिटांपर्यंत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. तुम्ही सोने खरेदी केल्यानंतर ते Vault मध्ये दिसेल.
6. तुम्ही केलेले पेमेंट रद्द झाले तर पुढील 3 दिवसात तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. एकदा गोल्ड खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ती रद्द करु शकत नाही. तर सध्याच्या भावानुसार MMTC PAMP वर विकू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –

Leave A Reply

Your email address will not be published.