‘ग्लोबल रँकिंग’मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाला ‘टॉप’ 300 मध्ये ‘स्थान’ नाही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच आलेल्या ग्लोबल रँकिंग 2020 च्या टॉप – 300 मध्ये भारतातील एकाही विद्यापीठाच्या नावाचा समावेश नाही. 2012 नंतर ही पहिली क्रमवारी आहे ज्यात टॉप 300 मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. परंतू भारताने ओवरऑल रँकिंगमध्ये 2018 च्या तुलनेत आपली क्रमवारी सुधारली आहे, यंदा या क्रमवारीत भारतीय विद्यापीठाची संख्या जास्त आहे. 2018 साली या यादीत 49 संस्थांना स्थान मिळाले होते. तर यंदा 56 संस्थाना स्थान मिळाले आहे. परंतू याच यादीत चीनच्या विद्यापीठांची संख्या जास्त आहे. चीनचे Tsinghua विद्यापीठ ग्लोबल रँकिंगमध्ये 23 व्या स्थानी आहे तर Peking 24 व्या स्थानी.
1. यूनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड (ब्रिटेन)
2. कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अमेरिका)
3. यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज (ब्रिटेन)
4. स्टँडफोर्ड यूनिवर्सिटी (अमेरिका)
5. मेसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अमेरिका)
यात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, रोपड पहिल्या 350 मध्ये आहे. तर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु टॉप 500 मध्ये आहे. IIT दिल्ली, IIT खडकपूर आणि जामिया मिल्लिया सह काही विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी