तिसर्‍या पिढीचं ‘अ‍ॅन्टी-टँक गाइडेड’ मिसाईलचं DRDO कडून ‘यशस्वी’ परिक्षण (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षण संशोधन विकास संस्थेने (DRDO) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नूल फायरिंग रेंजपासून मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेट मिसाइल सिस्टिमचे यशस्वी परिक्षण केले. हे या सिस्टिमचे तिसरे यशस्वी परिक्षण आहे. याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या वर्जनच्या अंटी टँक गाइडेड मिसाइलच्या गरजेनुसार विकासित करण्यात आले आहे. मिसाइल एक पोर्टेबल ट्रायपॉड लॉन्चरने लक्ष्यावर डागण्यात आले होते, त्याने लक्ष्यावर निशाणा साधला आणि ते नष्ट केले.

डीआरडीओकडून अनेक स्वदेशी बनावटीचे मिसाइल विकासित करण्यात येतात. यात देखील अल्ट्रा आधुनिक इमेडिंग इन्फ्रारेड रडाराचा समावेश करण्यात आला आहे. मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेट मिसाइल तिसऱ्या वर्जनचे एंटी टँक गाइडेड मिसाइल आहे. या मिसाइलमध्ये मारक क्षमता 2.5 किलोमीटर आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की या मिसाइलचा 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येणार आहे. 

 
Leave A Reply

Your email address will not be published.